निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणार आहेत.
जिल्ह्यातील *कोपरगाव* नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
*संगमनेर* नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व श्रीमती धनश्री पवार (मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*श्रीरामपूर* नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर) असतील, तर सहायक अधिकारी म्हणून मिलींदकुमार वाघ (तहसीलदार, श्रीरामपूर) व मच्छिंद्र घोलप (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद) कार्यभार सांभाळतील.
*जामखेड* नगरपरिषदेकरिता नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत-जामखेड) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद) व मच्छिंद्र पाडळे (नायब तहसीलदार, जामखेड) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
*शेवगाव* नगरपरिषदेकरिता प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी, पाथर्डी-शेवगाव) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून आकाश दहाडदे (तहसीलदार, शेवगाव) व श्रीमती विजया घाडगे (मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद) यांची नियुक्ती झाली आहे.
याशिवाय, *पाथर्डी* नगरपरिषदेकरिता सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून उध्दव नाईक (तहसीलदार पाथर्डी) व दिग्विजय पाटील (नायब तहसीलदार, पाथर्डी) कार्यभार पाहतील.
*राहाता* नगरपरिषदेकरिता श्रीमती मनिषा राशीनकर (उपजिल्हाधिकारी) यांच्यासह सहायक अधिकारी अमोल मोरे (तहसीलदार, राहाता) व वैभव लोंढे (मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद) असतील.
*राहुरी* नगरपरिषदेकरिता अनुपसिंह यादव (उपजिल्हाधिकारी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी नामदेव पाटील (तहसीलदार, राहुरी) व सोपान बाचकर (नायब तहसीलदार,राहुरी) नेमले गेले आहेत.
*देवळाली प्रवरा* नगरपरिषदेकरिता श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून ऋषिकेश पाटील (मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपरिषद) व डी.पी. शेकटकर (नायब तहसीलदार श्रीरामपूर) असतील.
*नेवासा* नगरपंचायतीकरिता सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर- नेवासा) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा) व निखिल फराटे (मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत) असतील.
*शिर्डी* नगरपरिषदेकरिता माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, शिर्डी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील; सहायक अधिकारी म्हणून सतिश दिघे (मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद) व बी.बी. मुळे (नायब तहसीलदार राहाता) यांची नियुक्ती झाली आहे.
*श्रीगोंदा* नगरपरिषदेकरिता श्री. श्रीकुमार चिंचकर (उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी म्हणून सचिन डोंगरे (तहसीलदार श्रीगोंदा) व श्रीमती पुष्पगंधा भगत (मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद) कार्यभार पार पाडतील.
सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.