नेवासा शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी नगरपंचायत चौकात आंदोलन
नेवासा ( प्रतिनिधी ) अनेक वर्षापासून नेवासा शहरातील नागरिकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी वेळोवेळी आंदोलने करून सुद्धा त्या आंदोलनाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नव्हती नेहमी नेवासा शहरात दिवसाआड येणारं पाणी दीड दोन वर्षापासून दहा दिवस पंधरा दिवस तर कधी वीस दिवस असा पाणीपुरवठा नेवासा शहराला होत असून नेवासा नगरपंचायत च्या धोरणाला कंटाळून मी नेवासकर संघटना आणि नेवासा शहरातील नागरिकांनी सदर कार्यालय व संबंधित कार्यालयायाचे अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी मी नेवासकर संघटनेचे शांताराम गायके यांनी नेवासा शहरातील पिण्याचा पाणीपुरवठाचा प्रश्न उपस्थित करून अधिकार्यांना धारेवर धरले तसेच संमपर्ण फौंडेशनचे डॉ. करण घुले यांनी सुध्दा सुधारीत पाणी योजना सुरू करण्यात यावी व शहरातील नागरिकांना मुबलुक पाणी वेळेवर मिळावे आणि एक्स्प्रेस वरील लाईट होणारा तुटवडा थांबवावा नेवासा शहरातील नागरिकांचा संयमाचा अंत संबंधित कार्यालयाने आणि प्रशासनाने व अधिकार्यांने घेवू नये अन्यथा नागरिकांच्या उद्राका पुढे संबंधित अधिकाऱ्यांचा निभाव लागणार नाही असे उद्गार विकास चव्हाण यांनी केले, वेळी माजी सरपंच सतिष गायके, नगरसेवक संदीप बेहळे आपचे संदिप अलवणे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.सदर आंदोलन च्या ठिकाणी नेवासा शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन मोठ्या प्रमाणात आंदोलनाला प्रतिसाद दिला. नेवासा शहरातील नागरिक महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी अनिल सोनवणे, शिवा राजगिरे, शिवाजी गायकवाड,मनेष चव्हाण, प्रकाश चव्हाण, हारुण जाहागिरदार,नविद शेख,संपत लष्करे ,रौफ सैय्यद ,राजु कनगरे,आशपाक पठाण, संपत आळपे तसेच महिला भगणी रेलकर ताई ,व्यवहारे ताई ,शोभाताई आलावणे यावेळी उपस्थित होत्या. या वेळी नेवासा पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.जनसामान्य नागरिकाचा भावनांचा आदर करून नेवासा नगरपंचायत चे मुख्याधिकारी संतोष लांडगे तसेच विद्युत महामंडळाचे कार्यकारी उपअभियंता बडवे यांनी लेखी आश्वासन देऊन येत्या आठ दिवसांमध्ये नेवासा शहराचा पाणीपुरवठा व एक्सप्रेस फिडरवर लाईट ही सुरळीत करण्यात येईल हेअसे लेखी आश्वासन दिले .त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे घोषित करून मुदतीत पुढील कार्यवाही झाली नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.