नेवासा तालुक्यातील खरवंडी ग्रामपंचायतचे सुमारे वीस वर्षांपूर्वी गाळे बांधलेले आहेत खरवंडी गावातील व्यापारी गाळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच व्यापाऱ्यांकडे आहेत सध्याची व्यापारी गाळे लिलाव करून विकले तर त्या मधून येणाऱ्या ग्रामपंचायत महसूल वाढणार आहे या गोष्टीकडे ग्रामस्थ गोरक्षनाथ कातोरे यांनी लक्ष वेधले असता स्थानिक ग्रामसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले यावर कातोरे यांनी गटविकास अधिकार्याकडे निवेदन सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी याबाबत सदरच्या व्यापारी गाळ्याचा लिलाव व्हावा असे आदेश ग्रामसेवकांना 28 एप्रिल 25 रोजी काढले होते
पण गेले चार महिने या आदेशाला ग्रामसेवकांनी अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होतच आहे अखेर कातोरे यांनी या विरुद्ध जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास गावकऱ्यांसह आंदोलन करण्यात येतील असे निवेदनात म्हटले आहे