श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

नेवासा (प्रतिनिधी)
सालाबादप्रमाणे नेवासा शहरात नाभिक समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन पतंजली पार्क नेवासा – नेवासा फाटा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे . ह. भ. प. गुरुवर्य भास्करगिरिजी महाराज , देविदास महाराज म्हस्के , उद्धव महाराज मंडलिक , नंदकिशोर महाराज खरात,सुनीलगिरी महाराज यांच्या आशीर्वाद व ह . भ. प. सचिन महाराज पवार मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नेवासा नगरीत श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन आज दि.20 ऑगस्ट रोजी होणार आहे,सकाळी ८ते ९ वाजता संत सेना महाराज अभंग व चरित्र पारायण होईल त्यानंतर गुरुवर्य ह. भ. प. गहिनीनाथ महाराज आढाव (श्री क्षेत्र नेवासा ) यांचे जाहीर हरी कीर्तन होईल . सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील संत महंत प्रकाशनंदगिरिजी महाराज (श्री क्षेत्र देवगड ),उद्धव महाराज मंडलिक (सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा बु.) ,सुनीलगिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर) , देविदास महाराज म्हस्के (ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा) , रामेशगिरी महाराज , भगवानजी महाराज जंगले शास्त्री , महंत गोपालगिरी महाराज ,नंदकिशोर महाराज खरात , मा.आमदार विठ्ठलराव लंघे (नेवासा विधानसभा) यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिर संस्थान नेवासा यांनी केले आहे

Leave a Reply