अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी इच्छुक बोहल्यावर!



नेवासा (संतोषकुमार भोंदे)
अहील्यानागर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक बिगुल अजून वाजलेले नसताना इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केल्याची चर्चा तालुक्यासह विशेषतः आमदार लंघे यांच्या कुकाना गटात रंगलेली दिसून येत आहे. मात्र माजी मंत्री शंकरराव गडाख गट वेट अँड वॉच च्या भूमिकेत दिसून येत आहे सत्ताधारी पक्षाकडून नेवासा तालुक्यातून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असल्याने यातून नाराजीचा फटका महायुतीला बसणार हे नक्की.काहीही झाले तरी आपण निवडणूक लढवणार असे चित्र काही नेते जाणून बुजून करत आहे त्यामुळे सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लघे यांची डोकेदुखी वाढली आहे.यातून पक्षश्रेष्ठी कसा मार्ग काढतील आणि विरोधकांना कसे तोंड देतील हे येणारा काळच ठरवेल तालुक्यातील राजकीय अभ्यास पाहता माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व असून त्याला कितपत सुरुंग महायुती लावेल हे जनताच ठरवेल . राष्ट्रवादी चे काही कार्यकर्ते तर आजच आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य झालो असे वावरताना दिसत आहे .महायुती चे सर्वच घटक पक्ष काही गटात आणि गणात आग्रही आहे पण सत्ताधारी आमदार याला कितपत महत्त्व देतात आनी मित्र पक्ष काय निर्णय घेतात की स्वतंत्र निवडणूक लढवतात आणि शंकरराव गडाख काय राजकीय खेळी खेळतात हे पाहणे गरजेचे आहे .काही निवडक कार्यकर्ते तर आज तालुक्याचे आमदार आपणच आहोत आणि आमदार सोडून मी विकास कामे केलेली आहे आणि करतो आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहे .जाहिरातीसाठी डिजिटल बोर्ड सोशल मीडिया आणि गावोगावी महिलांची टीम कार्यरत आहे . जिल्हा परिषद प्रमाणे पंचायत समितीला सुध्धा तसेच चित्र आहे.एका गणातून तीन ते चार इच्छुक असल्याने आणि मी नाही तर कोणी नाही या भूमिकेमुळे गडाख यांना आयते कोलीत मिळाले आहे यात गडाख आपला कसा राजकीय फायदा उचलतात हे पाहणे गरजेचे आहे . काहीही असो पण अश्या कार्यकर्त्यांमुळे आमदार विठ्ठलराव लांघे मेटाकुटीला येणार हे नक्की.

Leave a Reply