You are currently viewing खोट्या गुन्ह्यातून ॲड.संजय सुखदान यांचे नाव वगळा -नेवासा वकील संघ

खोट्या गुन्ह्यातून ॲड.संजय सुखदान यांचे नाव वगळा -नेवासा वकील संघ

नेवासा प्रतिनिधी
नेवासा तालुका वकील संघाचे सदस्य ॲड.संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावर नेवासा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सूडबुद्धीने दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी नेवासा वकील संघाच्या वतीने नेवासा पोलिस ठाण्यात भव्य मोर्चा काढण्यात आला त्यावेळी नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात वकील संघाचे सदस्य ॲड.संजय लक्ष्मण सुखदान हे नेवासा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात काही दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षकारांने त्यांच्या कार्यालयात येऊन नेवासा -श्रीरामपूर मार्गावर एका महिलेला धक्का लागला असून मी घाबरून घरी निघून गेल्याचे सांगितले त्यावेळी ॲड संजय सुखदान यांनी पक्षकाराला जो प्रकार घडला त्याची खबर नेवासा पोलीस ठाण्यात देण्यास सांगितले व पोलिस कायदेशीर कारवाई करतील असा सल्ला दिला तेव्हा पक्षकाराने तुम्ही आमच्या सोबत या अशी विनंती केली तेव्हा घटनेची माहिती देण्यासाठी ॲड संजय सुखदान नेवासा पोलीस ठाण्यात गेले होते.पण तेथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी वयक्तिक आकसापोटी जाणीवपूर्वक ॲड संजय सुखदान यांच्यावर खोटा गुन्हा गु. र. नं. १-७३१ /२०२५ भा. न्या. सं . कलम २२९ (२),२३६,२३७,२३८,२४०,३(५) व ६१(२) वगैरे कलमान्वे दाखल केला.याच्या निषेधार्त वकील संघाच्या वतीने नेवासा येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले .निवेदनात वकील संघाने आरोप केला आहे की तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जाणीवपूर्वक ॲड.संजय सुखदान यांचे नाव सामील केले आहे सदरचा प्रकार हा निंदनीय आहे. पक्षकारांना सल्ला दिला असेल तर त्यांना एखाद्या गुन्ह्यात आरोपी करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे .झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठीचा प्रस्ताव ८ दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावा अन्यथा वकील संघ आंदोलन तीव्र करेल असे या निवेदनात म्हटले आहे . यावेळी ॲड.बन्सी सातपुते , अध्यक्ष ॲड.गणेश निकम , उपाध्यक्ष ॲड.सुदाम ठुबे , ॲड.नीरज नांगरे , ॲड.पांडुरंग माकोणे सह वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply