नेवासा( प्रतिनिधी )
नेवासा शहरातील सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. सौंदाळा या गावाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून छत्रपती च्या जयंतीनिमित्त जात मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.
छत्रपती चे विचार अंगीकृत करून समाज कल्याणासाठी सर्व समाजाला बरोबर घेऊन दिशा देण्याचे काम केले पाहिजे. माजी सरपंच शिवाजी टेकावडे या वेळी सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, प्रा. रविंद्र चव्हाण डॉ. राहुल चव्हाण नगरसेवक सोनल चव्हाण जेष्ठ मार्गदर्शक सुभाष चव्हाण बहुजन नेते फिलिप वढागळे यश चव्हाण सुशिल चव्हाण अरुण चव्हाण शुभम चव्हाण हर्षल चव्हाण मनेश चव्हाण इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन संस्थापक अध्यक्ष विकास चव्हाण यांनी केले
आभार डॉ राहुल चव्हाण यांनी मानले.