नेवासा शहर तसे धार्मिक आणि अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते . पण वीज पाणी आणि घनकचरा म्हणले की सगळ्यांचीच बुद्धी भ्रष्ट होते आज एकादशी तरीही शहरातील काही भागातील वीज या मुजोर कर्मचार्यांनी परमिट न घेता फक्त डीपी बंद करून वीजपुरवठा बंद केला तांत्रिक कामाचा हवाला देऊन चौकशी केली तर उडवा उडवीची उत्तरे देऊन नागरिकांची दिशाभूल करतात .याला उत्तर कोण देणार राजकारणी राजकारण करण्यात व्यस्त आणि जनता फक्त बिल भरून अन्याय सहन करणार .आमदार आणि पालकमंत्री तरी लक्ष देणार का की जनता दिलेल्या मतदानाचा मनस्ताप सहन करणार हे येणारा काळच ठरवणार .
बीपी आणि हार्ट चे पेशंट यांना काही इजा या मुजोर कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे काही अनुचित झाले तर सर्वांवर गुन्हे दाखल करावयाची धमका सत्ताधारी दाखवतील का ?
दररोज अशी कोणती कामे ही वीजकर्मचारी करतात हे त्यांनाच माहीत. पण यासाठी होणारे ही आंदोलन हे खूप तीव्र स्वरूपाचे असेल याची दखल वीजवितरण कंपनीने घ्यावी .